spot_img
15.3 C
New York
Tuesday, September 9, 2025

Buy now

spot_img

उपसरपंचाचा खून ! डोक्याला गोळीची जखम

गेवराई :  लुखामसला येथील उपसरपंच यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बार्शीतील सासुरे गावात आज (दि.९) सकाळी उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्या की हत्या याचे कारण अस्पष्ट असून, या घटनेने गेवराई तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गोविंद जगन्नाथ बरगे (वय ३८, रा. लुखामसला, ता.गेवराई) असे मृत झालेल्या उपसरपंच यांचे नाव आहे. सोमवारी गोविंद बरगे हे खासगी कामानिमित्त बार्शी (जि. सोलापूर) येथे कारने गेले होते. आज सकाळी बरगे यांचा सासुरे गाव शिवारात कारमध्ये मृतदेह आढळून आल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे हे पथकासह घटनास्थळावर दाखल झाले.
घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीस पाठविण्यात आला. दरम्यान, गोविंद बरगे यांच्या डोक्याला पिस्टलची गोळी लागल्याची जखम आढळून आली असून, त्यांच्या कारमध्ये पिस्टल देखील निदर्शनास आल्याने बरगे यांनी गोळी मारून आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली. याचे कारण अस्पष्ट आहे. मात्र, या धक्कादायक घटनेमुळे गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या