चंद्रपूर : खोट्या आणि बनावट मतांचा राहुल गांधींनी आरोप केल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा असे काही बनावट मतदार समोर आलेत. चंद्रपूरच्या घुग्गूस या शहरामध्ये वेगवेगळ्या धर्माचे एकाच घरात 119 मतदार सापडलेत. काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी मतदार यादीतूनच ही नाव समोर आणली आहे.
बनावट आणि एकाच पत्त्यावर वेगवेगळे मतदार वाढवून वोट चोरीचा आरोप राहुल गांधींनी केला आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे प्रकार उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे. चंद्रपूरच्या घुग्गुस शहरामध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते सय्यद अन्वर यांनी एकाच घरामध्ये तब्बल 119 मतदार शोधून काढले. घुग्गुस मधलं 350 क्रमांकाच घर आहे. ज्यामध्ये हिंदू मुस्लिम बौद्ध असे सर्व समाजाचे 119 मतदार आहेत. मतदार यादीमध्ये स्पष्ट दिसतं की मतदारांची नाव वेगवेगळी आहेत मतदार क्रमांक सुद्धा वेगळे आहेत. ममता धुपे, आदर्श मोरे, जिजाबाई गजभिये, उदय गोदारी या सर्वांच्या नावावर घर क्रमांक 350 हेच आहे. अशी या यादीमध्ये 119 नाव आहेत. घुग्गुस मधलं 350 क्रमांकाच घर हे राजू बांदुरकर यांचं आहे आणि तेही चकित झालेत. इतकंच नाहीतर त्यांच्या घराच्या पत्त्यावर 119 मतदार कसे झाले? असा सवाल घर मालक असल्याने त्यांनाही पडला. तर दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी बनावट मतदार कार्ड समोर आणली आहे.