अकोला : परम पूजनीय श्री माताजी यांच्या परम कृपेमध्ये दिनांक १०.०८.२५ रोजी सहज योग मुख्य ध्यान केंद्र अकोला येथे सहज संगीत स्पर्धा व रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सर्व महाराष्ट्र सामूहिकतेने पाठविलेल्या राख्या श्री माताजींच्या श्री चरणी अर्पण केल्यानंतर सर्व बहिणींकडून भावांना रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. व सर्व सहज योगी भावांनी आपल्या बहिणींना ओवाळणीमध्ये एक पेड श्री मॉं के नाम भेट दिले. रक्षाबंधन निमित्त पर्यावरण संदेश देण्यात आला. कार्यक्रमासाठी सर्व युवाशक्ती यथाशक्ती यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाश्री माताजींचे कोटी कोटी आभार.

