बीड : परमपूज्य श्री माताजींच्या परमकृपेत १० ऑगस्ट २०२५ रोजी बीड येथे सहजयोग जिल्हास्तरीय प्रचार प्रसार कार्यशाळा महाराष्ट्र नॅशनल स्कूल प्रोपगेशन टीमच्या अंतर्गत उत्साहात पार पडली . यावेळी जिल्ह्यातील सहजयोगींनी मोठ्या संख्येने या कार्यशाळेला उपस्थिती दर्शविली.
या कार्यशाळेमध्ये शाळा महाविद्यालयांमध्ये प्रचार प्रसार करण्यापूर्वी परमिशन घेताना कशा पद्धतीची परमिशन घ्यावी या विषयी संतोष सोनवणे (शालेय प्रचार प्रसार प्रमुख जळगाव जिल्हा) यांनी वेगवेगळे दाखले देऊन समजावून सांगितले. तर नरेंद्र नेमाडे यांनी शालेय प्रचार प्रसार करताना काय करावे आणि काय करू नये या विषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य बालशक्ती समन्वयक स्मिताताई ठाकूर यांनी प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना सहजयोगातील विषय गोष्टींद्वारे कसा समजावून सांगावा, हे विस्तृतरित्या समजावून सांगितले. वर्षाताई नेमाडे यांनी प्राथमिक वर्गातील तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रास्ताविक कार्यक्रमाचे सुंदर प्रात्यक्षिक करून दाखवले. तर यामिनी ताई सोनवणे यांनी माध्यमिक विद्यालयाचे कोर्स कंटेंट व्यवस्थितरित्या समजावून प्रास्ताविक कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवले. संध्या ताई पाटील यांनी शिक्षकांच्या गाईड बुकचे थोडक्यात विवेचन करून प्रास्ताविक कार्यक्रमाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. माध्यमिक आणि शिक्षकांच्या दोन्ही सेशनच्या मध्ये जोडणार्या दुवा आणि महिला शक्तीला प्रेरित करणार्या गार्गी,मैत्रेय यांचे उदाहरण देऊन आदिशक्तीच्या अमृतवाणीमधून महिलांचे काय स्थान आहे आणि किती महत्व आहे, हे सुद्धा समजावले..
महाराष्ट्र राज्य शिक्षण प्रचार प्रसार प्रमुख डॉ. रूपालीताई चौधरी यांनी महाविद्यालयांमध्ये सहजयोगाचे प्रात्यक्षिक कसे सांगावे, याबाबत विश्लेषण करून सांगितले. रूपाली ताईं यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच भारतीय संत साहित्य आणि सहजयोग यावर काही निवडक संतांच्या ओव्या, भजन यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात कसा सहजयोग सांगावा सुंदर असे प्रात्यक्षिक करून दाखवले.
या कार्यशाळेमध्ये रिजनल युवाशक्ती समन्वयक अमोल मापारी तसेच बीड जिल्ह्यातील जवळपास ८-९ तालुक्यातून यथाशक्ती, युवाशक्ती, महिलाशक्ती तसेच बालशक्ती सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. यातील दहा ते बारा सहजयोग्यांनी सेशनचे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवले. यामध्ये काही बालशक्तीनी सुद्धा प्रात्यक्षिक सेशन करून दाखवले. अशा या झालेल्या सुंदर कार्यशाळेतमार्फत बीड जिल्ह्यामध्ये सहजयोगासाठी उत्तम असे वक्ते तयार होऊन, प्रचार प्रसाराची उत्तम माध्यमे बनून सहजयोगाचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा.. अशी श्री माताजींच्या श्रीचरणाशी प्रार्थना करण्यात आली.
श्री माताजींच्या परमकृपेत बीड जिल्हा समन्वयक वैजयंता पवार काकू, स्कूल अभियान प्रमुख शितलताई आंधळे,प्रचार प्रसार प्रमुख बाळासाहेब शेळके, युवाशक्ती प्रमुख मनिषा ताई यादव या सर्वांच्या नेतृत्वाखाली या कार्यशाळेचे आयोजन अगदी सुंदर रीत्या पार पडले. संपूर्ण बीड जिल्हा समिती तसेच सर्व तालुका प्रतिनिधी या सर्वांच्या सहकार्याने ही कार्यशाळा संपन्न झाली. शेवटी सहजयोग पद्धतीने रक्षाबंधन सोहळा देखील संपन्न झाला आणि सर्वांचा आनंद द्विगुणीत झाला.