spot_img
20.3 C
New York
Friday, August 8, 2025

Buy now

spot_img

सिन्नरची भूमिकन्या : धनश्रीने केले रोइंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावच्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेली भूमिकन्या धनश्री भास्कर सांगळे हिने आपल्या प्रतिभेच्या बळावर जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले. जर्मनीत नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये तिने सिंगल स्कल रोइंग प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत फायनल ’ई’ श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला, तर एकूण जागतिक क्रमवारीत २४ वा क्रमांक मिळवला. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.जर्मनीत या स्पर्धा दि. २५ ते २७ जुलै या कालवधीत पार पडल्या. त्यात जगातील २८ देशांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत धनश्रीने भारताचे प्रतिनिधित्व केले.
२०१९ मध्ये नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर धनश्रीला प्रथमच रोइंग या खेळाविषयी माहिती मिळाली. तिने त्याचा अभ्यास सुरू केला, मात्र कोरोना महामारीमुळे तिच्या सरावात खंड पडला होता. त्यानंतर तिने केटीएचएम कॉलेज बोट क्लबमध्ये नियमित प्रशिक्षण घेतले. २०२१ पासून तिला स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. आणि तिने तिच्या प्रबळ परिश्रमाच्या जोरावर या खेळात यश किळवले. धनश्री शालेय जीवनापासून विविध क्रीडा प्रकारांत सहभाग घेत होती, त्यावरून तिचा खेळातील रस दिसून येत होता असे तिचे वडील भास्कर सांगळे यांनी बोलताना सांगितले.

ताज्या बातम्या