spot_img
24.9 C
New York
Wednesday, August 6, 2025

Buy now

spot_img

जिल्हा क्रीडा संकुलाला ना.अजितदादांनी दिला २५ कोटींचा निधी

आ.संदीप क्षीरसागरांनी मानले आभार
बीड : बीड जिल्हा क्रीडा संकुलाला उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांनी २५ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. बुधवारी (दि.६) रोजी झालेल्या बैठकीत हि मंजुरी देण्यात आली. बीड मतदारसंघासह जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रा संबंधित विकासाला चालना दिल्याबद्दल चालना दिल्याबद्दल आ.संदीप क्षीरसागर यांनी ना.अजित दादा पवार यांचे आभार मानले आहेत.
बीड शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल याठिकाणी अनेक विकास कामे होणे आवश्यक होते. याबाबत आ.संदीप क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते. बीड विधानसभा मतदारसंघ आणि बीड जिल्ह्यातील विविध खेळाडू या ठिकाणी सरावासाठी असतात. त्यांना दर्जेदार सुविधा आणि आवश्यक संसाधने यांची उपलब्धता असणे क्रमप्राप्त आहे. जिल्ह्याचे नाव क्रीडा क्षेत्रात उंचावण्यासाठी खेळाडूंना आवश्यक सोयी-सुविधा देणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून आ.संदिप क्षीरसागर यांचा, जिल्हा क्रीडा संकुल येथे विविध विकास कामे होण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. त्यावर बीड येथे झालेल्या बैठकीत ना.अजितदादांनी जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकास कामांच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन २५ कोटी रुपयांचा भरघोस निधी दिला. या निधीतून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात मोठ्या प्रमाणावर विविध विकास कामे केली जाणार आहेत. त्यामुळे आ. क्षीरसागर यांनी ना.अजित दादांचे यांचे आभार मानले आहेत.

ताज्या बातम्या