ज्ञानेश्वर काकड | नाशिक
सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथे मंगळवार दि.५ ऑगस्ट २०२५ रोजी दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. यावेळी घरातील पेटीचे लॉक तोडून आतमधील रोख रक्कम लंपास केली . या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर तालुक्यात काही दिवसांपासून भुरट्या चोरांनी धुमाकुळ घातली असून वाडी- वस्त्यांवरील नागरिकांना चोरट्यांच्या भीतीमुळे रात्र रात्र जागून काढावी लागत आहे.सिन्नरच्या सरहद्दीवर असणार्या जोगलटेंभी येथे दि.५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या वरील बंद रूमचा दरवाजाचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश केला. आत मध्ये ठेवलेल्या लोखंडी पेटीचे कुलूप व कोंडा तोडून त्यातील अंदाजे ५८ हजार रुपये किमतीचे दागिने व अठरा हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी नारायण बारकू सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टेमगर करत आहेत.
सिन्नर तालुका व सीमेवरील गावांमध्ये चोर्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. चोर्या, घरफोड्या करणार्या एकास नागरिकांनी पकडून सिन्नर जात एमआयडीसी पोलिसांच्या हवाली केले होते. वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे.