spot_img
22.2 C
New York
Wednesday, August 6, 2025

Buy now

spot_img

संभाजीनगरमध्ये वकीलाने केसच्या नावाखाली महिलेबरोबर केलं कांड

छत्रपती संभाजीनगर : पतीपासून वेगळा राहणार्‍या २७ वर्षे महिलेची ओळख करून एका वकिलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं . शरीर संबंध ठेवण्यासाठी वारंवार मारहाण व लैंगिक शोषण केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे . यातून महिला दोन वेळा गर्भवती राहिल्याने त्याचा गर्भपात करण्यात आला .लग्नाचा विषय काढल्यानंतर पीडित महिलेला गाडीने उडवण्याची वकील आरोपीने धमकी दिल्यानंतर मोठा करणे सिडको पोलीस ठाण्यात वकिलाविरोधात लैंगिक शोषणाचा पुन्हा दाखल करण्यात आला आहे .
महेंद्र भगवान नैनाव असे ३४ वर्षीय आरोपीचे नाव आहे .याप्रकरणी २७ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, न्यायालयीन प्रक्रिया दरम्यान महिलेची आरोपी वकील अशी ओळख झाली होती . कधीपासून विभक्त झालेल्या महिलेशी संपर्क वाढवून आरोपीने ओळख वाढवली .महिलेला लग्नाचा अमिष देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढलं . तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवले . आजारपणातही शरीर संबंध ठेवण्यास आरोपीने तरुणीला भाग पाडलं असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत .
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २०१८ मध्ये महिलेचे लग्न झाले होते .तिला सहा वर्षांचा मुलगा आहे .लग्नानंतर काही वर्षांनी पतीसोबत न पटल्याने पती पत्नीची कौटुंबिक न्यायालयात केस सुरु होती . या न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान आरोपी वकिल महेंद्र नैनाव या वकिलाने महिलेशी मोबाईल नंबरची देवाण घेवाण केली . दोघांची मैत्री झाली . आरोपी वकिलाने महिलेला लग्नाचं अमिष दिलं . पीडित महिलेला ८ मार्च ते १२ जून दरम्यान शहरातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला . लग्नाचं आमिष दाखवून महिलेशी शरीरसंबंध ठेवले . तुझं ङङइ चं शिक्षण होईपर्यंत आपण खोली भाड्यानं घेऊन राहू असं सांगून दोघे एकत्र राहू लागले . या दरम्यान पीडित महिला दोनवेळा गर्भवती राहिली . महेंद्रने तिला गर्भपात करायला लावला . महिलेनं वारंवार लग्नाची मागणी केल्यानंतर आरोपी वकिलाने पीडितेला आजारी असतानाही शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता . नंतर मारहाण सुरू झाली . लैंगिक शोषण केले . ३ ऑगस्ट रोजी आरोपीने पीडित महिलेला गाडीने उडवण्याची धमकी दिल्यानंतर महिलेनं पोलीस ठाणं गाठलं. त्यानंतर आरोपी वकिला विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय .

ताज्या बातम्या