ज्ञानेश्वर काकड | नाशिक
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार यांच्या अनुदानातून व श्रीराम लीला एज्युकेशन सोसायटी नाशिक च्या वतीने आयोजित ’’ थोर पुरुष यांची जन्म व पुण्यतिथी, उपक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सफाई कामगार महिलांचा सन्मान परिचारिका व अशा वर्कर आणि बालवाडी शिक्षिका जुने भांडे करणार्या महिला यांचे प्रमाणपत्र ट्रॉफी फुलगुच्छ शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
शालेय विद्यार्थी निबंध तसेच वकृत्व स्पर्धा चे बक्षीस वितरण शुक्रवार दिनांक १/ ८/ २०२५ रोजी सकाळी सातपूर येथील त्रंबक रोड लगत अयोध्या हॉटेल मौले पेट्रोल पंप शेजारी नियोजित कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमा स सौ सीमाताई हिरे आमदार नाशिक पश्चिम व मुख्य यांनी शुभेच्छा दिला. प्रवक्ते डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज अध्यक्ष( सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन महाराष्ट्र) यांनी शुभ आशीर्वाद दिला व डॉ. संजय दुर्जड बिटको हॉस्पिटल नासिक यांच्याद्वारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन परिचय वर व्याख्यान दिले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री सुनील बच्छाव सर भाजपा नाशिक जिल्हाध्यक्ष मा. श्री गिरीशजी पालवे साहेब (माजी नाशिक महानगर शहराध्यक्ष) मा. डॉ. श्री संजय दुर्जड कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी राहून व श्री शरद भाऊ शिंदे मातोश्री फाउंडेशन तथा उद्योजक. आणि श्री बाळासाहेब घुगे या सर्व मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला . सदर कार्यक्रमाचे आयोजक श्रीरामलीला एज्युकेशन सोसायटी नाशिक व पदाधिकारी अध्यक्ष मा. अरुणाताई दरगुडे सचिव मा. श्री रंगनाथ दरगुडे उपाध्यक्ष मा. श्रीमती अनिताताई नागरे उपाध्यक्ष मा. सौ शिल्पाताई झारेकर मॅडम कोषाध्यक्ष मा. श्री डॉक्टर संकेत नागरे व सूत्रसंचालन मा. श्री बी के नागरे सर व श्री दीपक शेवाळे यांनी केले. परिसरातील सर्व बंधू-भगिनी व विद्यार्थी आणि मित्र मंडळ यांची कार्यक्रमास उपस्थिती होती . कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी पोवाडे गाणे तसेच लावणी यास कलागुणांची उजळणी करण्यात आली. त्याचप्रमाणे उपस्थित महिलांनी देखील लावणी पोवाडा व गीत गाऊन सर्व परिसर आनंदमय करून टाकला. संस्थेच्या अध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करताना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी महिलांसाठी जे समाज प्रबोधन केले त्यामुळेच आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज समाजात सर्वत्र बिनधास्त व निडर भवित विरहित आणि आत्मविश्वासाने वावरत आहे प्रगतीच्या पथावर चालताना या देशातील महिलांचा देखील ह्याचा वाटा आहे आणि या निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांना सर्व महिलांच्या वतीने त्रिवार अभिवादन असे मनोगत व्यक्त करून संस्थेचे सचिव श्री रंगनाथ दरगुडे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कार्यक्रमानिमित्त अण्णाभाऊ साठे यांनी समाजप्रबोधनात आणि साहित्य क्षेत्रात जे उल्लख नि काम केले त्याची समाजाला आपणास गरज होती ही काळाची गरज ओळखून अवघ्या दीड दिवस शाळा शिकलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी आज आपल्यासाठी कथा कादंबरी साहित्य लेखन आणि गीत पोवाडे त्यांची प्रसिद्ध असलेली छक्कड माझी मैना गावाकडे राहिली या त्यांच्या आशयाचा बोध घेणारी छक्कड म्हणजेच लावणीचा एक प्रकार यातून समाज प्रबोधन केले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊंनी फार मोठं योगदान दिलेला आहे या निमित्ताने आज त्यांच्या आठवण झाली व आजच्या दिवशी अण्णाभाऊंना त्रिवार अभिवादन करून नतमस्तक होऊन त्यांनी केलेल्या कार्याचा असाच दिवसान दिवस समाजामध्ये प्रचार प्रसार करत राहू अशी आश्वासन दिले. संस्थेच्या उपाध्यक्ष सौसिल्पाताई झारेकर यांनी देखील अण्णाभाऊंच्या जीवन चरित्र पटावर व्याख्यान दिले त्यांचे कुटुंब अत्यंत गरिबीचे हलकीचे आणि अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या जीवनामध्ये किती हल अपेक्ष सोसावा लागल्या तरी देखील त्यांचे उच्च विचार समाजापुढे त्यांनी मांडले आणि एक नवचैतन्य असा भरलेला संवाद निर्माण करण्याचा त्यांचा ध्यास होता महिलांसाठी त्यांनी जे समाज प्रबोधन केले त्यामुळे आज समाजातील स्त्रिया बिनधास्त आणि आत्मविश्वासाने वावरताना दिसतात ही केवळ अण्णाभाऊ साठे सारख्या समाजसुधारकांच्या अतोनात मेहनतीचा फळ आहे. अशा पद्धतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मनसाचा कार्यक्रम आज सातपूर येथील आयत्या हॉटेल या सभागृहात संपन्न करण्यात आला या कार्यक्रमास अतिथी महिला विद्यार्थी शिक्षक तसेच समाज बांधव उपस्थित होते .