लातूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये लातूरमध्ये मोठा राडा झाला. विधानसभेत रमी खेळणार्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मागणार्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना दादांच्या पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी कोपराने आणि बुक्क्यांनी मारहाण केली. सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण केली. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सुनील तटकरे हे आज लातूर येथे कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेला ते संबोधित करत होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी आले. सभागृहात गेम खेळणार्या कृषिमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही याबाबत त्यांनी निवेदन दिलं. त्याचवेळी छावा संघटनेच्या पदाधिकार्यांनी सुनील तटकरेंच्या समोर पत्ते टाकले. यानंतर राष्ट्रवादी आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते भिडले. यामध्ये राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला जोरदार मारलं. सूरज चव्हाण यांनी हाताच्या कोपराने, बुक्क्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचं दिसून येतंय.
लातूर येथील विश्रामगृहात खा.् र्डीपळश्रढरींज्ञरीश यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी तिथे आले व त्यांनी कृषीमंत्र्यांनी केलेल्या कृतीबाबत तटकरे यांना जाब विचारला.
या मारहाणीनंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा म्हणून आम्ही सुनील तटकरेंना निवेदन द्यायला गेलो होतो. त्यांना घरी पाठवा असं सांगितलं. या नंतर आम्ही दुसर्या हॉलमध्ये बसलो असता त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे गुंड आले आणि त्यांनी आम्हाला मारहाण सुरू केली. सत्तेचा माज काय असतो तो आम्हाला बघायला मिळाला.
अजितदादा, आज तुमच्या कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. ही शेतकर्यांची मुलं आहेत. निवेदनाला जर तुम्ही लाथा बुक्क्यांनी प्रतिसाद देत असाल तर त्याचा हिशोब होणार. याचा राजकीय हिशोब तुम्हाला चुकवावा लागणार असा इशारा विजय घाटगे यांनी दिला.