spot_img
22.1 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img

वैर माझ्याशी होतं, माझ्या मातीची बदनामी का?

धनंजय मुंडेंचं २०० दिवसांनी विरोधकांना शेरोशायरीतून उत्तर; म्हणाले, जुबान काट लो लहजा…
तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता, अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता, अशी शेरोशायरी करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे   यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ) यांच्या उपस्थितीत बीडमध्ये निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातून धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
धनंजय मुंडे म्हणाले की, मी तटकरे साहेबांना विनंती केली होती की, मला आज भाषण करायचे नाही. कारण सांगितले नाही पण तुमच्यासमोर कारण सांगावे लागेल. इथं बोलावं की मैदानात बोलावं हा प्रश्न माझ्या मनात होता. म्हणून आज आपल्या सर्वांचे क्षमा मागून इथे आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत ते आपल्याला माहित आहे. आजपर्यंत ते करत आलोय हे देखील आपल्याला माहित आहे. बीडचा आगळावेगळा इतिहास आपल्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्राला दाखवावा याच अपेक्षेने ते आज आले आहेत.आपण सर्वजण मिळून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बीड जिल्ह्याच्या प्रति असणारी अपेक्षा नक्कीच पूर्ण करू, असे वचन आपण तटकरे साहेबांना देऊ, असे त्यांनी म्हटले.
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, बर्‍याच दिवसांनी मी बोलतोय. न बोलण्याची डबल सेंच्युरी माझी झाली आहे. २०० दिवस न बोलता काढले आहेत. या दोनशे दिवसांमध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या, त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिव्हारी लागली. ती म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी. ज्यांनी कोणी केली, भलेही तो बीडच्या मातीतला असेल, बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्यांना एवढंच सांगायचं वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? त्यांना एवढं सांगणं आहे.
ज्यांनी ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना, एक व्यक्ती, एक जिल्हा, एक माती, एक मतदारसंघ अशा पद्धतीने बदनामी केली. त्यांच्या प्रति चार ओळी म्हणणार आहे. तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नही सकता, अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता, अशी शेरोशायरी करत धनंजय मुंडेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

ताज्या बातम्या