spot_img
28.3 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img

अनैतिक संबंध : जाळलेली विवाहिता निघाली जिवंत

पंढरपूरमधील मंगळवेढा तालुक्यातील पाठकळ येथील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका विवाहितेचा जळीत मृतदेह आढळल्यानंतर संबंधित विवाहिताच जिवंत असल्याचे समोर आले. मात्र या विवाहितेने लव अफेअरसाठी प्रियकराच्या मदतीने तिसर्‍याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला. अगदी हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशा रीतीने एक धक्कादायक घटना समोर आली असून पोलिसांनी त्यांच्या कौशल्याने हा सर्व बनाव उघडा पाडला आहे. आता यामध्ये जाळलेली महिला कोण याचा पोलीस शोध घेत असून विवाहिता व तिच्या प्रियकराला पोलिसांनी गजाआड केलं आहे.
एखाद्या हिंदी सस्पेन्स चित्रपटाला साजेल अशी मृत्यूची थरारक आणि ट्विस्टपूर्ण घटना मंगळवेढ्यात घडली. मंगळवेढ्यातील पाटकळ मध्ये एका विवाहितेचा जळीत अवस्थेतील मृतदेह सापडला. घरासमोरील गवताच्या गंजीत जळालेल्या अवस्थेत या मृतदेहा मुळे घरातील विवाहित सुनेनेच आत्महत्या केल्याचे सर्वांना वाटले. यानंतर या मुलीचे माहेरकडील कुटुंबीय या ठिकाणी दाखल झाले. आपल्या मुलीची आत्महत्यानसून तिची हत्या झाल्याचा आरोप विवाहितेच्या कुटुंबाने पोलिसांकडे केला. पोलिसांनी तपास सुरू करतात त्यांना ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय येऊ लागला. त्यातच या विवाहितेचा फोन तिच्या अंगावर जळालेल्या अवस्थेत सापडल्याने पोलिसांचा संशय बळावला. या फोनची सीडीआर चेक केल्यानंतर त्यांना एका तरुणावर संशय आला. पोलिसांनी लगेच या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली असता सुरुवातीला या प्रियकराने आपणच या विवाहितेची हत्या केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्याला घटनास्थळी घेऊन जाऊ लागले असता त्याने पुन्हा घटनेची खरी कबुली देत ज्या विवाहितेची हत्या झाली आहे ती मेलेली नसून जिवंत आहे असे सांगितल्याने पोलीसही बुचकळ्यात पडले. यानंतर या प्रियकरास त्या विवाहितेला व्हिडिओ कॉल करण्यास सांगितल्यावर दुसर्‍या बाजूने ती विवाहिताच बोलू लागली आणि पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी तातडीने हा प्रियकर आणि कराड येथे गेलेली ती विवाहिता यांना ताब्यात घेतले आणि संपूर्ण खुनाचा उलगडा झाला.
मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांच्या पत्नी किरण राहत होते. १४ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास किरण या २३ वर्षीय विवाहितेने आपल्या शेतातील कडब्याच्या गंजीत स्वतःला पेटवून घेतल्याच चित्र निर्माण केले. यानंतर किरणचा नवरा नागेश हा पत्नी वियोगाने रडत होता. त्याचवेळी किरणचे वडील देखील घटनास्थळी पोहोचले. किरणच्या वडिलांनाही आपल्या मुलीचा मृतदेह ओळखता आला नाही. तात्काळ किरणच्या वडिलांनी पोलिसांना आपल्या मुलीच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्याची विनंती केली. किरणने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला. यातील विवाहिता किरण सावंत आणि तिचा प्रियकर वीस वर्षीय निशांत सावंत यांचे काही महिन्यापासून अफेअर सुरू होते. विशेष म्हणजे या विवाहितेला दोन वर्षाची गोड मुलगी देखील आहे. आपण दोघे कायमचे पळून जायचे असे या दोघांनी ठरवले आणि त्यातूनच ही भयानक खुनाची स्टोरी रचली गेली. यामध्ये किरण हिने आत्महत्या केल्याचा बनाव रचायचा यासाठी गवताच्या गंजीत पेटवून मृत्यू झाल्याचे दाखवायचे असे ठरले. मात्र यासाठी कोणाचातरी मृतदेह यात असणे आवश्यक असल्याने किरण आणि निशांत यांनी बेवारस वेडसर महिलेचा शोध सुरू केला.
आठ दिवसांच्या शोधानंतर पंढरपूरच्या गोपाळपूर जवळ एक वेडसर महिला तिच्या मुलाच्या शोधात फिरत असल्याचे निशांत याला दिसले. यानंतर त्याने तिला तिच्या मुलाला शोधून देतो असे सांगून पाटकळ येथील सावंत वस्ती येथे घेऊन आला. यानंतर दोन दिवसापूर्वी तिचा गळा दाबून खून करून घटने दिवशी या गवताच्या गंजीत तिचा मृतदेह ठेवला आणि गवताची गंजी पेटवून दिली. यावेळी त्यांनी किरणचा मोबाईल या मृत महिलेच्या अंगावर ठेवला. रात्री अडीचच्या सुमाराला गवताची गंजी पेटवण्यापूर्वी किरण हिला घरातून बाहेर बोलवून डाळिंबाच्या बागेत लपायला सांगितले. यानंतर गंजी पेटवून निशान निघून गेला. आग भडकलेली पाहताच परिसरातील ग्रामस्थ आग विजवायला आले . यात निशांत ही सामील होता. या गंजीमध्ये एका महिलेचा मृतदेह दिसल्याने किरण हिनेच आत्महत्या केली असे कुटुंबाला वाटले. मात्र किरणच्या वडिलांना संशय आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आणि या जळालेल्या मोबाईलवरून पोलिसांना संशय वाढला. सुरुवातीला पतीची चौकशी केल्यानंतर पोलिसांना यात त्याचा हात नसल्याचे दिसल्याने नंतर या मोबाईल सीडीआरवरून निशांतपर्यंत पोलीस पोहचले आणि निशांतने किरणच्या मदतीने केलेल्या या सस्पेन्स खून प्रकरणाचा उलगडा केला. सध्या विवाहिता किरण आणि निशांत पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र स्वतःचे विवाह बाह्य अफेअर झाकून कायमचे मजेत जीवन जगण्यासाठी एका निष्पाप वेडसर महिलेचा हत्या करणार्‍या या जोडीला पोलिसांनी त्यांचा इंगा दाखवत या प्रकरणाचा उलगडा केला आहे.

ताज्या बातम्या