नवी दिल्ली : शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदे गटास देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर आज (14 जुलै) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी आपण मुख्य याचिकेवर निर्णय करू तेच योग्य राहील, असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले. आपण ऑगस्टची तारीख ठरवू, तोपर्यंत तुम्ही निवडणुका आल्या, तर निवडणूक लढा, असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून जी अनिश्चितता होती, त्यावर आज सुप्रीम कोर्टाने स्वत:हून ऑगस्टमध्ये तुम्हाला तारीख देऊ, असं सांगितल्याने सुप्रीम कोर्टातील आजच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (णववहर्रीं ढहरलज्ञशीरू) यांना तुर्तास दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे. ऑगस्टमध्ये शिवसेना नाव आणि चिन्हावर निकाल लागल्यास महाराष्ट्रातील राजकारणावर, विशेषत: आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर मोठा प्रभाव टाकू शकतो.
सुप्रीम कोर्टात काय काय घडलं?,पॉईंट टू पॉईंट- शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदे गटास देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.उद्धव ठाकरेंच्या मागणीला एकनाथ शिंदेंचा विरोध शिंदे गटाकडून मुकूल रोहतगी आणि नीरज किशन कौल यांनी यिु्क्तवाद केला. तर ठाकरे गटाकडून रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याप्रकरणाची मुख्य सुनावणी सुरु करण्याचे सांगितल्यानंतर कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील तारखेची मागणी केली. न्यायमूर्तींनी माझे वेळापत्रक तपासून तुम्हाला सुनावणीची तारीख कळवतो. तोपर्यंत तुम्ही निवडणुका आल्या तर निवडणूक लढा, असे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले. शिवसेना पक्ष व चिन्ह शिंदे गटास देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये धनुष्यबाणावर ऑगस्टमध्ये यावर सुनावणी घेणार असल्याचं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितले.