बीड : जिल्ह्यात पशु आरोग्य सेवक या पदासाठी शासनामार्फत भरती होत असल्याची खोटी माहिती सोशल मीडियावर व विविध माध्यमांतून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात पशुसंवर्धन विभागामार्फत अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे की सद्यस्थितीत अशा कोणत्याही भरतीसाठी प्रक्रिया सुरू नाही.
ही माहिती फसवणूक करणार्यांनी हेतुपुरस्सर पसरवली असून त्याद्वारे आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा बनावट भरतीच्या जाहिरातींना बळी न पडता नागरिकांनी अधिकृत शासकीय संकेतस्थळांवरूनच खात्री करावी. बीड शहर पोलीस विभागामार्फत यासंदर्भात खालील उपाययोजना करण्यात येत आहेत:
१. सोशल मीडियावर प्रसारित होणार्या बनावट जाहिरातींवर लक्ष ठेवून आवश्यक कायदेशीर कारवाई करणार आहोत. यासाठी कोणाच्या तक्रारी असल्यास त्याची दखल घेऊन त्याविरुद्ध सुद्धा कारवाई करणार आहोत.
२., सायबर क्राईम विभागामार्फत तपास व खोटी माहिती देणार्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल.
३. सोशल मीडिया, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थि, सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी देण्यात येणारी माहिती, पाम्प्लेट्स, याद्वारे नागरी जनतेसाठी जागरूकता मोहीम राबवण्यात येणार आहे.
४.बनावट वेबसाइट्स व मोबाईल नंबर बंद करण्यासाठी संबंधित यंत्रणेशी समन्वय समन्वय साधून अशा प्रकारच्या वेबसाईट किंवा मोबाईल नंबर शोध घेऊन ते बंद करण्यात येतील.
नागरिकांनी कोणतीही भरती किंवा जाहिरात मिळाल्यास तीची खातरजमा अधिकृत शासकीय संकेतस्थळावरून करावी. कुठलीही संशयास्पद माहिती आढळल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. असे आवाहन बीड शहर प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबा राठोड यांनी केले आहे.