गेवराई : चकलांबा दि.२/०७/२०२५ पोलीस अधिक्षक नवनीत कॉंवत यांनी अवैध धंद्यांवर कठोर कारवाईच्या दिलेल्या आदेशानुसार चकलांब्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पुन्हा वाळू तस्करांवर कारवाई केली आहे.गोदापात्रात केलेल्या या कारवाईत २७ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी चकलांबा-पोलीस ठाण्यात १) विकास संपत केसभात रा. गायकवाड जळगाव २) मोहम्मद अहमद शेख रा. सुकली रा. शेवगांव जिल्हा अहिल्यानगर अश्या ०२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चकलांबा पोलीस स्टेशन हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी मागच्या काही दिवसांत वाळू तस्करांवर मोठ्या कारवाया केल्या आहेत.बुधवारी (दि.२) महारटाकळी येथे नदी पात्रात एक ट्रॅक्टर चोरटी वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पाटील यांनी आपल्या कर्मचार्यांना सूचना करत कारवायाचे आदेश दिले.त्यानुसार पोलिसांनी छापा मारला असता यावेळी वाळू तस्करी करणारे टॅक्टर व एक जेसीबी आढळून आले.त्यानुसार दोन्ही वाहने ठाण्यात आणण्यात आली असून या कारवाईत २७ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉंवत,अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर,पोलीस उपअधीक्षक श्री.राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील पोह/१५३३ अमोल अंकुश येळे पोशी / २००४ कैलास विठ्ठल खटाने पोशी/२३१ प्रशांत कल्याण घोंगडे आदींनी केली आहे.