spot_img
14.7 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

spot_img

बीड बंद, क्लासेसच्या गेटला फासले काळे

बीड : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन चर्चेत असलेल्या बीडमध्ये दररोज नवनवे प्रकार समोर येत आहेत. कधी मारहाण, कधी दहशत पसरवण्याचा प्रकार, कधी रिल्स, तर कधी बँकेच्या फसवणुकीमुळे कर्जबाजारीमुळे आत्महत्यासारख्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्यातच, आता बीडमध्ये अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावरुन, विविध पक्ष संघटना आणि पालक आक्रमक झाले असून बीड बंदची हाक देण्यात आली आहे. याबाब पोलिसांना निवेदनही देण्यात आलं आहे. संबंधित घटनेतील आरोपी शिक्षकाला अटक करण्याच्या मागणीसाठी, तसेच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आली आहे.
बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आंदोलकांनी पोलीस तपास यंत्रणेला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. या प्रकरणातील दोन शिक्षक अद्याप फरार असून फरार शिक्षकांना अटक करण्याच्या मागणीसाठी पक्ष संघटना आणि पालकांनी क्लासेसच्या गेटला लावण्यात आलेल्या आरोपी शिक्षकांच्या फोटोला काळे फासून ठिय्या मांडला. दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेतली. या प्रकरणातील दोन फरार शिक्षकांना अटक न केल्यास सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना राजकीय पाठबळ असल्याने ते फरार होण्यास यशस्वी झाले. आरोपींना अटक करून क्लासेसच्या इमारतीला सील ठोकावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

ताज्या बातम्या