spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

अंबाजोगाई बसस्थानकात प्रवाशाला चिरडले

अंबाजोगाई : बीडमध्ये अपघातांचा सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीय .बीडच्या अंबाजोगाई मध्ये बस स्थानकावर सकाळी भीषण अपघात घडलाय .दुसर्‍या बसमध्ये चढत असताना बाजूला उभ्या असलेल्या एका बस ने प्रवाशाला चिरडले आहे .या अपघातात प्रवासाचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातामुळे बस स्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे . अंकुश मोरे असे मृत प्रवाशाचे नाव आहे .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बस स्थानकावर भीषण अपघात झालाय . दुसर्‍या बस मध्ये चढताना बाजूने आलेल्या बसने प्रवाशाला चिरडले आहे .यात प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे .की दुर्घटना बस स्थानकाच्या आवारात सकाळी घडली .अंकुश मोरे हे दुसर्‍या बस मध्ये चढत असताना शेजारी उभ्या असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस प्रवाशाच्या अंगावरून गेली .या अपघातात अंकुश मोरे या प्रवासाचा जागीच मृत्यू झाला .या प्रकारामुळे काही काळ बस स्थानकावर मोठी खळबळ उडाली होती . चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशाचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बीडमधून भीषण अपघाताची घटना समोर आली होती.

ताज्या बातम्या