सनकी निलेश चव्हाणचे कारनामे उघड
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निलेश चव्हाण याचा इतिहास देखील स्वतःच्या पत्नीच्या अमानुष छळाचा राहिला आहे. स्पाय कॅमेर्याच्या साहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केल्याबद्दल निलेश चव्हाणवर २०१९ साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल झाला आहे.
तीन जून २०१८ ला निलेश चव्हाणच लग्न झालं. जानेवारी २०१९ मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूममधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. तिने निलेशला याबद्दल विचारलं असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. पुढच्या फेब्रुवारी महिन्यात निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. त्यावेळीही निलेशने उडवाउडवीची उत्तर दिली. एक दिवस निलेशच्या बायकोने त्याचा ल्यापटॉप उघडून पहिला असता, त्यामध्ये त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडीओ स्पाय कॅमेर्याच्या साहाय्याने रेकॉर्ड केल्याचं तिला आढळून आलं. बेडरूममधील लाईट सुरु ठेऊन शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. त्या लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह्य अवस्थेतील व्हिडीओ देखील आढळून आले.
निलेशच्या पत्नीने याबात जाब विचारला असता त्यानं घरातील चाकूने तिला धमकावलं आणि तिचा गळा दाबला. त्याचबरोबर बळजबरीने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. निलेशच्या पत्नीने निलेशच्या आई – वडिलांना आणि कुटुंबातील इतरांना याची माहिती दिली असता त्यांच्याकडून तिचाच छळ सुरु करण्यात आला. त्यानंतर पुढचे अनेक महिने निलेश तिच्या पत्नीचा छळ करत राहिला. अखेर निलेशच्या पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिने दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर १४ जून २०२२ ला गुन्हा दाखल झाला. त्याचा अटकपूर्व जमीनअर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर देखील वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. अखेर मुंबई उच्च न्यालयाने त्याला अटकपूर्व जमीन दिला. निलेश चव्हाणचा बांधकाम व्यवसाय आहे आणि पोकलेन मशीनचा देखील तो व्यवसाय करतो. निलेश चव्हाण हा शशांक हगवणेची बहिण करिश्मा हगवणेचा मित्र म्हणुन ओळखला जातो. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादामधे तो अनेकदा सहभागी असायचा. कर्वेनगर भागातील औदूंबर पार्क सोसायटीत निलेश चव्हाणच्या वडीलांच्या नावे तीन फ्लॅट आहेत.
कस्पटे कुटुंबीयांच्या (वैष्णवीच्या माहेरचे) तक्रारीवरुन निलेश चव्हाण याच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याबद्दल आणि पिस्तुलाच्या सहाय्याने दहशत निर्माण केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० मे रोजी वैश्नवीच्या माहेरचे लोक तीच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वे नगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले असता निलेश चव्हाणने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हीसकाऊन लावले होते् . कस्पटे कुटुंबीयांनी बाळाचा ताबा मागीतल्यावर तो देण्यास त्याने नकार दिला होता. वैश्नवीचे काका मनोज कस्पटे यांनी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीसांकडे बाळाला बेकायदेशीर डांबून ठेवल्याची तक्रार दीली. मात्र पोलीसांनी धमकावल्याच्या आरोपाखाली निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केलाय. निलेश चव्हाण हा वैनवीचा नवरा शशांक आणि वैश्नवीची नणंद करिश्मा हगवणेचा मित्र आहे.