spot_img
14.7 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

spot_img

पाकिस्तानी रॉकेट भारताने पाडलं

भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत काल (७ मे) पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. भारताच्या या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान घाबरल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार गोळीबार करण्यात येत आहे. यानंतर आता अमृतसरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.
अमृतसरजवळच्या जेठुवाल गावात पाकिस्तानी रॉकेट पाडण्यात आलं आहे. जेठुवाल गावाजवळील आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ पाकिस्तानी रॉकेट पाडण्यात आलं आहे. भारतीय सैन्याने रॉकेटचे अवशेष ताब्यात घेतलं आहे. काल रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानचे रॉकेल पाडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, भारतीय वायुदलाला सरकारकडून खुली सूट देण्यात आली आहे. पाकिस्तानी विमानं आकाशात दिसल्यास तोडीस तोड उत्तर देण्याची मुभा सरकारकडून भारतीय वायुदलाला दिली आहे.
एकीकडे भारतानं पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना मारलंय. तर दुसरीकडे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानच्या सैन्याला घरात मारलंय. बलुचिस्तानच्या बोलन दर्रा भागात स्फोट घडवण्यात आला ज्यात पाकिस्तानचे १२ सैनिक ठार झालेत. या स्फोटाची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मीनं स्वीकारली आहे. बलुच लिबरेशन आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल स्कॉडनं हल्ला केलाय.
पाकिस्तानी दहशतवाद आणि पाकिस्तान सरकार हे काही वेगळं नाही हे पुन्हा एकदा जगासमोर आलंय. काल भारतााने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पाकिस्तानच्या पेकाटात लाथ घातली. त्यानंतर पाकिस्तानचा खरा दहशतवादाचा चेहरा जगासमोर आला. लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी खालिद मुदस्सीरला पाकिस्तानी सैन्याने काल चक्क गार्ड ऑफ ऑनर दिला. दुसरीकडे काल लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांचा जनाना निघाला. त्यात पाकिस्तानचा कुख्यात दहशतवादी रौफ प्रार्थना करताना दिसला. तिसरीकडे मुरिदकेमधील लष्कर ए तोयबाच्या मुख्यालयाची दृश्य हाती आली आहेत. विशेष म्हणजे या दहशतवादी तळावर चक्क पाकिस्तानचं एक सरकारी ऑफिस असल्याचंही दिसून आलंय.

ताज्या बातम्या