spot_img
19.4 C
New York
Wednesday, April 30, 2025

Buy now

spot_img

बीडमध्ये मोबाईल चोर पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बीड : शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनित कॉवत यांच्या आदेशवरून स्थाक गुन्या शाखा खडबडून जागी झाली असुन मोबाईल चोरी च्या गुन्हा तील दोन आरोपिना मद्देमालासह अटक केली १० मोबाइल सह दोन लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला
फिर्यादी अभिषेक दिनकर केदार वय २० व्य.शिक्षण रा.संतज्ञानेश्वर नगर यांनी पो.स्टे.शिवाजीनगर येथे फिर्याद दिली की, दि.११ एप्रिल २०२५ रोजी रात्री ०९.१५ वा. सुमारास पिंपरगव्हाण रोड, गायत्री दुकानाच्या जवळ रोडवरुन घरी फोनवर मित्राला बोलत चालत जात असतांना पाठीमागुन काळया रंगाच्या स्प्लेंडर मोटार सायकलवर तिघेजण आले व त्यातील एका अज्ञात इसमाने माझा मोबाईल हिसकावुन घेवुन ते तिघे तेथुन निघुन गेले. वगैरे फिर्याद वरुन पो.स्टे.शिवाजीनगर बीड येथे गु.र.नं.२१०/२०२५ कलम ३०९(४),३(५) भा.न्या.सं.२०२३ अन्वये गुन्हयाची दि.१२ एप्रिल २०२५ रोजी नोंद करण्यात आली आहे.
सदर गुन्हयाचा उकल करण्याचे द्ष्टीकोणातुन मा.पोलीस अधीक्षक,बीड यांनी पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड यांना आदेश दिले. त्यावरुन पो.नि. स्था.गुशा.बीड यांनी आपले अधिपत्याखालील पोउपनि सुशांत सुतळे व त्यांचे पथकाला गुन्हयाचे उघडकीस आणण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केले. पोउपनि सुशांत सुतळे यांनी त्यांची गोपनिय यंत्रणा सतर्क करुन दिनांक २८/०४/२०२५ रोजी स्थागुशा पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, दोन इसम हे बीड शहरातुन वेगवेगळया ठिकाणाहुन मोबाईल हिसकावुन चोरुन नेलेले मोबाईल विकणेकामी समर्थ मंगल कार्यालय समोर ते अहिल्यानगर जाणार्‍या रोडवर येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली तेव्हा सदर माहिती पो.नि. स्था.गु.शा. यांना देवुन त्यांनी तत्काळ पुढील कारवाई करणेचे आदेश दिल्याने स्थागुशा पथक बातमी ठिकाणी जावुन तेथे सापळा लावला असता एक मोटार सायकलवर दोन इसम आल्याचे दिसुन आले तेव्हा त्यांचेकडे जात असतांना त्यांनी तेथुन मो.सा.वर पळुन जाण्याचे प्रयत्नात असतांना त्यांना पथकाने पकडुन त्यांची नावे विचारली असता १) आदित्य बंकट नरवडे वय १९ वर्षे रा.बालेपीर ता.जि.बीड, २) नामदेव रामप्रसाद डोईफोडे वय १९ वर्षे रा.ईट ता.जि.बीड असे सांगितले. मोबाईल हिसकावुन चोरी केलेल्या घटनांबाबत बारकाईने विचारपुस केली असता आदित्य नवडे व त्यांचे इतर दोन साथीदार यांनी मिळुन मो.सा.वर जावुन मो.सा.वर जावुन मोबाईल बोलत चालत असलेल्या लोकांचे मोबाईल हिसकावुन चोरी केल्याची कबुली दिली असुन त्यांचे ताब्यातुन एकुण १० रिअल मी, सॅमसंग अल्ट्रा, रिअल मी, विवो, ओपो, पो.को. कंपनीचे मोबाईल व गुन्हयात वापरलेली स्प्लेंडर मोटार सायकल असा एकुण २,८७,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन आरोपींकडुन खालील नमुद उकल करण्यात स्था.गु.शा.पथकाला यश आले आहे.
१) पो.स्टे.शिवाजीनगर गुरनं २१०/२०२५ कलम ३०९(४), ३(५) भा.न्या.सं. २) पो.स्टे.शिवाजीनगर गुरनं १६५/२०२५ कलम ३०४(४) भा.न्या.सं. ३) पो.स्टे.बीड शहर गुरनं ४०/२०२५ कलम ३०३(२), भा.न्या.सं. ४) पो.स्टे.बीड शहर गुरनं ६७/२०२५ कलम ३०९(४), ३(५) भा.न्या.सं. सदर गुन्हयात एकुण तीन आरोपी निष्पन्न करण्यात आलेले असुन १) आदित्य बंकट नरवडे रा.बालेपीर व २) नामदेव रामप्रसाद डोईफोडे यांना पो.स्टे.शिवाजीनगर,बीड यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. त्यांचेकडुन मोबाईल चोरीचे आणखीन इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्तता आहे. उर्वरित एक आरोपीचा शोध घेवुन त्यास अटक करण्याचे प्रयत्न चालु आहे.
सदरची कामगिरी . नवनित कॉंवत पोलीस अधीक्षक बीड, . सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, उस्मान शेख पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सुशांत सुतळे पोह/मारुती कांबळे, पोह/विकास राठोड, बाळकृष्ण जायभाये, देविदास जमदाडे, पोशि/ नारायण कोरडे, अश्विनकुमार सुरवसे, चापोह/नितीन वडमारे यांनी मिळुन केली आहे.

ताज्या बातम्या