spot_img
22.1 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img

माय-लेकराच्या आत्महत्येने वायगाव आमला शोकसागरात

 

बीड : गेवराई तालुक्यातील वायगाव आमला येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. एका तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आईनेही प्रचंड दुःखातून आत्महत्येचा मार्ग पत्करला. या दुहेरी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

अभिमान खेत्रे (वय अंदाजे 35) या तरुणाने काल (दि. 28 एप्रिल) दुपारी फाशी घेत आपले जीवन संपवले. ही माहिती आई कौशल्या भागुजी खेत्रे (वय अंदाजे 70) यांना कळताच त्या प्रचंड मानसिक तणावात आल्या आणि त्यांनीही काही वेळातच विषारी औषध सेवन केले. अभिमानचा मृत्यू काल सायंकाळी चार वाजता झाला, तर आई कौशल्याबाईंचा मृत्यू आज (दि. 29 एप्रिल) सकाळी दहा वाजता उपचारादरम्यान झाला.एका घरात एकाच वेळी दोन मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून नातेवाईक, शेजारी आणि गावकरी मोठ्या दुःखात आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत

आहेत.

ताज्या बातम्या