spot_img
22.1 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img

वाल्मिक कराडच्या भितीने कासले हर्सुलमध्ये

बीड : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करणारा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले याला हलवण्यात आले आहे. त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रणजीत कासलेला बीड कारागृहातून हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडसह सुदर्शन घुले आणि इतर आरोपी बीड कारागृहात आहेत. अशातच रणजीत कासलेने वाल्मीक कराड याच्यावर गंभीर आरोप केले होते. ट्रॉसिटी प्रकरणात सध्या रणजीत कासले न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने त्याची रवानगी हर्सुल कारागृहात करण्यात आली. कासले विरोधात बीड जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाणे, अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे आणि परळी पोलीस ठाण्यात कसले विरोधात गुन्हे दाखल आहेत.

ताज्या बातम्या