spot_img
24.3 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img

अक्षय तृतीयेला येणार लाडक्या बहीणीचे पैसे

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी लागू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थींच्या खात्यात ३० एप्रिल २०२५, अक्षय तृतीया च्या दिवशी जमा केला जाणार आहे. सरकारकडून यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली असून, अनेक महिलांना या हप्त्याची प्रतीक्षा होती.
राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी ही योजना जुलै २०२४ मध्ये सुरू केली होती. त्यानंतर दरमहा पात्र महिलांच्या खात्यात आर्थिक मदत जमा केली जाते. मात्र, अलीकडे झालेल्या पडताळणीमुळे काही महिला योजनेतून वगळण्यात आल्या आहेत. यामुळे एप्रिल महिन्यात लाभार्थ्यांची संख्या वाढेल की घटेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी ‘एक्स’वर पोस्ट करत माहिती दिली की, ही योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लागू आहे. त्यामुळे दर महिन्याला वयोमर्यादा पार करणार्‍या महिलांचा लाभ थांबतो. सध्या १.२० लाख महिला वयोमर्यादेमुळे योजनेतून वगळल्या गेल्या आहेत.
तसेच, लग्नानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांना देखील योजनेचा लाभ मिळणार नाही. आतापर्यंत सुमारे ११ लाख अर्ज अयोग्य ठरले असून, २.५ कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेमुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी केली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुती सरकारसाठी ही योजना ’गेम चेंजर’ ठरली. जानेवारीपासून पात्र महिलांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे, कारण काही महिलांनी अयोग्यरीत्या या योजनेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या.

ताज्या बातम्या