spot_img
25 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img

भीषण अपघात; सिन्नर तालुक्यातील दोन ठार, ७ जखमी

मयतात ५ वर्षीय मुलीचा समावेश
लोणारे कुटुंब चालले होते तुळजापूर दर्शनाला
नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील लोणारे कुटुंब तुळजापूरला दर्शनाला जात होते. पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान चालकाला डुलकी लागल्याने मारोती इको डिव्हायडरवर धडकली. यामध्ये २ जण ठार तर ७ जण जखमी झाले. ही घटना गेवराई जवळील रांजणी फाट्याजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ घडली. जखमीवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमीमध्ये ३ लहान मुलांचा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात असलेल्या सिन्नर येथील लोणारे कुटुंब तुळजापूर येथे देवदर्शनाला जात होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने गाडी थेट गेवराईजवळ असलेल्या रांजणी फाट्याजवळ असलेल्या डिवायडरला धडकली. अपघातात श्रावणी योगेश लोणारे (४), शंभू योगेश लोणारे (१.५), समर्थ योगेश लोणारे (१०), पुजा रामेश्वर लोणारे (२८), रामेश्वर पोपट लोणारे (३७), पुनम योगेश लोणारे (३७), ईश्वरी रामेश्वर लोणारे (५), दत्तात्रय सोमनाथ आडभाई (४५) हे आठ जण जखमी झाले. तर योगेश पोपट लोणारे (४०) हे ठार झाले आहेत. जखमींना रूग्णालयात दाखल केल्यानंतर यातील ईश्वरी रामेश्वर लोणारे या ५ वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर होती. उपचारा दरम्यान काल दुपारी १२.०० च्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी लोकसेवा मंडळाचे नारायण पवार सह आदींनी मदत केली. जखमीवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या