बीड : केळगाव येथील आश्रम शाळेत विनाअनुदानीत पदावर शिक्षक म्हणून काम शिक्षकाने शनिवारी सकाळी बीड शहरातील कृष्णा बँकेच्या दारातच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.केज तालुक्यातील केळगाव येथील धनंजय अभिमान नागरगोजे राहणार.देवगाव ता.केज हा कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता.सदरील शिक्षक हा गेल्या अनेक वर्षांपासून विना अनुदान तत्वावर कार्यरत होता . सरकारने २०१९ साली २० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती . मात्र ते अनुदान सुरू झाले नाही . गेल्या अनेक वर्षांपासून अनुदान नसतानाही विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करणार्या शिक्षकाने अखेर आपली जीवनयात्रा संपवली . सकाळी स्वराज्य नगर येथे घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त काही वेळातच देण्यात येईल.