केज : केज शहरातून विवाहित तरूणी आणि तरूण पळून गेल्याची घटना समोर आली आहे. २५ वर्षीय तरुणी आणि २९ वर्षांच्या तरुणाचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, ते दोघेही विवाहित असून त्या तरुणीला दोन मुले आहेत. तर तिचा प्रियकर सुद्धा विवाहित असून त्यालाही एक मूल आहे. दोघांच्या कुटुंबियांनी केज पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत. या घटनेची शहरात चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात दोघे हरवल्याची वेगवेगळी तक्रार दाखल झाली आहे. केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.