बीड : जिल्ह्यात सध्या पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाया सुरू असून शनिवार दि.८ मार्च रोजी हिवरसिंगा येथे १४ लाख ५३२० रूपयांचा गुटखा पकडण्यात आला .
बीड जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कारवाया करून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.नवनीत सर यांनी दिल्या आहेत. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उस्मान यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हिवरसिंगा ता. शिरूर कासार येथील एक इसम याने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत गुटख्याचा साठा केला असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे पथकास सुचना देवून कारवाईसाठी रवाना केले असता शनिवार दि.८ मार्च २०२५ रोजी मौजे हिवरसिंगा ता. शिरूर येथे इसम नामे बंडू निवृत्ती जाधव रा. हिवरसिंगा यांचे घरी छापा टाकला असता एकूण १४,५०,३२०/- किंमतीचा विमल गुटखा मिळून आला. संबंधित आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन शिरूर कासार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई मा.श्री. नवनीत सर , पोलीस अधीक्षक बीड, मा.श्री. सचिन सर, अप्पर पोलीस अधीक्षक, बीड मा.श्री.उस्मान सर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम, पो.हवा.अशोक, दीपक, सोमनाथ, बाळू, अर्जुन, नारायण, सिद्धेश्वर असे स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली आहे.