spot_img
10.3 C
New York
Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

आठ हजाराची लाच घेताना आरटीओचा एजंट पकडला

बीड : आरटीओ अधिकारी रंजीत पाटील यांच्या नावाने लाचेची मागणी करत आठ हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने एका खाजगी इसमाला पेठबीड विभागातून रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे आरटीओ विभागाचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहेत.
अब्दूल रहिम अब्दूल मजीद असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराकडून टेम्पोच्या वाहनाची तपासणी केल्यानंतर फिटनेस प्रमाणपत्र देण्याकरिता १० हजारांची लाच सदर आरोपीच्या स्वत:साठी व आरटीओ अधिकारी रंजीत पाटील यांच्याकरिता मागितली होती. यात तडजोडीअंती ८ हजारांची लाच स्विकारण्यात आली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीला लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर आरोपीच्या घराची झाडाझडती देखील सुरू आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस निरीक्षक युनूस शेख, सुरेश सांगळे, भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, अमोल खरसाडे, अंबादास पुरी यांनी केली.

ताज्या बातम्या