spot_img
11.9 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

spot_img

संत शिरोमणी गुरू रविदास जयंतीनिमित्त समाजबांधवांनी तिसरे धर्मस्थान पुणे कात्रज येथे उपस्थित रहा

पुणे : भारतामध्ये चर्मकार समाजाचा स्वाभिमान असणारे तीन धाम आहेत त्यामध्ये डेरा बल्ला जालंदर पंजाब हे पहिले त्यानंतर शीर गोवर्धन पूर येथील संत शिरोमणी गुरु रविदास यांचे जन्मस्थान हे दुसरे व महाराष्ट्र सह दक्षिण भारतातील चर्मकारांसाठीचे दक्षिण काशी असलेले कात्रज पुणे येथील गुरु रविदास मंदिर हे तिसरे धर्मस्थान किंवा धाम आहे. सोळा वर्षांपूर्वी अखिल भारतीय चर्मकाराच्या साठी रविदासिया धर्माची स्थापना झाली आणि त्या रविदासिया धर्माच्या प्रचार प्रसारासाठी अखिल भारतीय रविदास या धर्म संघटन ची स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष संतश्रेष्ठ सुखदेव जी वाघमारे महाराज हे आहेत. आत्तापर्यंत रविदास जयंती शिरगोवर्धनपुर वाराणसी येथे सन्मानपूर्वक साजरी होत असे. आपल्यापैकी बर्‍याचशा चर्मकार बांधवांनी काशी येथे दर्शन घेतले असेल.
दक्षिणेकडील सर्व राज्य आणि विशेषता महाराष्ट्र राज्यातील सर्व खेड्यापाड्यातील चर्मकार बांधवांना हा लाभ घेता यावा आणि यापुढे नियमितपणे घेता येईल म्हणून पहिल्यांदा पुणे येथील रविदासांच्या तिसर्‍या धर्म स्थानामध्ये संतश्रेष्ठ गुरु रविदास यांची ६४८ वी जयंती उत्सव सन्मानपूर्वक साजरा करण्याचा निर्णय संतश्रेष्ठ सुखदेव जी महाराज यांनी घेतला आहे. धर्मापेक्षा कुठलीही व्यक्ती संस्था किंवा संघटना ही मोठी असू शकत नाही. आपण हिंदू देवी देवता यांच्या यात्रेला जाताना स्वतःहून कॅलेंडरमध्ये तारीख शोधतो पण आपल्याच संतश्रेष्ठ गुरु रविदास यांच्या जयंतीची तारीख समाज बांधवांना कळवावी लागते यापेक्षा खेदाची गोष्ट काय असेल. आपण सर्व चर्मकारांची जास्तीत जास्त संख्या तिथे उपस्थित झाली तर आपले संघटन मजबूत असल्याचे शासनाच्या आणि प्रशासनाच्या लक्षात येईल. तेव्हा आपण व्यक्ती संस्था किंवा संघटना सर्वांनी दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोज बुधवारी कात्रज पुणे येथील संत शिरोमणी गुरु रविदास यांचे तिसरे धर्मस्थान येथे मिळेल त्या वाहनाने पोहोचा व बहुसंख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या