बीड : येथे प्रभू विश्वकर्मा जयंतीनिमित्त सोमवार दि.१० फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आहे.
बीड शहरातील तळेगाव येथे प्रभू विश्वकर्माचे मंदिर आहे. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याहीवषी जयंती महोत्सव थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त भव्य असे रक्तदान शिबिर सोमवार दि.१० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त रक्तदानाचे महत्त्व समजून रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.आणी श्रींच्या पुजेनतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभू विश्वकर्मा सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे करण्यात येत आहे.