spot_img
17.3 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img

दिल्लीत भाजपची मुसंडी

२७ वर्षांनी सत्तेच्या जवळ, ’आप’ला मोठा धक्का!
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) पिछाडीवर पडला आहे. भाजप सत्तेच्या दिशेने आगेकूच करत आहे.
दिल्ली निवडणुकीची मतमोजणी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. भाजप बहुमताने विजयाकडे वाटचाल करत आहे आणि आम आदमी पक्ष खूप मागे आहे. दरम्यान, भाजपने एक पोस्टर प्रसिद्ध केले आहे, ज्यामध्ये इंडिया गेटवर कमळ फुललेले दिसत आहे.
अरविंद केजरीवालांचे विचार, चारित्र्य शुद्ध नाही, म्हणूनच पराभव झाला. त्यांचे जीवन निष्कलंक नव्हते, मतदारांचा विश्वास नव्हता की हे आमच्यासाठी काही करतील. मी वारंवार सांगितलं मात्र त्यांनी ऐकलं नाही. दिल्लीत दारूच्या ठेक्यांच्या माध्यमातून जो आर्थिक घोटाळा झाला त्यामुळे ते बदनाम झाले. एकीकडे केजरीवाल लोकांच्या चारित्र्याबद्दल बोलतात मात्र दुसरीकडे दारू ठेक्यांमधे घोटाळे करतात, असं लोकांना वाटायला लागलं.
– अण्णा हजारे, समाजसेवक
प्राथमिक कलानुसार, दिल्लीतील ७० जागांपैकी तब्बल ४६ जागांवर भाजप आणि आम आदमी पक्ष २४ जागांवर आघाडीवर आहे. तर कॉंग्रेस पक्षाला अद्याप खाते उघडता आलेले नाही. आम आदमी पक्षाचे जवळजवळ सर्व मोठे चेहरे पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. अरविंद केजरीवाल, सौरभ भारद्वाज, आतिशी, सोमनाथ भारती, सत्येंद्र जैन, अवध ओझा हे आपापल्या जागांवर भाजपपेक्षा मागे आहेत. मनीष सिसोदिया फक्त जंगपुरा मतदारसंघातून आघाडीवर आहेत, पण तिथेही चुरशीची लढत आहे.

ताज्या बातम्या