spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

मांजरसुंबाजवळ अपघात; दोघांचा मृत्यू

बीड : जिल्ह्यात अपघाताची मालिका सुरूच असून शुक्रवारी केजजवळ दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी ताजी असतानाच रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मांजरसुंबा जवळील मुळूकवाडी येथे देव दर्शन करून परत येत असताना दोन वाहनाची धडक झाली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून तीन गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
बीड जिल्ह्यात मागील काही दिवसात अपघाताच्या प्रमाणत वाढ झाली आहे.दिनाक 7 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान मुळुकवाडी येथे भिषण अपघात झाला या अपघातात या अपघातात डॉ.ओंकार ज्ञानोबा चव्हाण, डॉ.मृणाली भास्कर शिंदे, हे ठार झाले तर डॉ.ऐश्‍वर्या मंथन चव्हाण, डॉ.मंथन चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. जेजुरी वरून देवदर्शन करून गावी सोनपेठ कडे जात असताना मुळुकवाडी येथील पुलावर गाडी आदळल्याने गाडीचा चकनाचुर झाला.वाहन क्रमांक MH. 22 – 4571 या वाहानाने मुळकवाडी जवळील पूलाला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे समजते पूणाला धडक देताच गाडीचे टायर निखळुन पडले.अपघाताचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले

ताज्या बातम्या