spot_img
4.3 C
New York
Thursday, December 11, 2025

Buy now

spot_img

ना. पंकजा मुंडे बीडच्या संपर्कमंत्री

भाजपने दिली नवी जबाबदारी
सरकार आणि संघटन दरम्यान समन्वय साधण्यासाठी भाजपकडून राज्यात संपर्कमंत्री जाहीर
बीड :  राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे हयांची भारतीय जनता पक्षाने बीड जिल्हयाच्या संपर्कमंत्री म्हणुन नियुक्ती केली आहे.
पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय राहावा यासाठी संपर्क मंत्र्यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पक्षाच्या बैठकीत केली. जेथे इतर पक्षांचे पालकमंत्री आहेत, तेथे भाजपने मंत्रिमंडळातील भाजपच्या मंत्र्यांकडे संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. या मंत्र्यांकडे एकप्रकारचे जिल्ह्याचे भाजपचे पालकत्वच असणार आहे. बीड जिल्ह्याच्या संपर्कमंत्री म्हणून राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, पक्षाने दिलेली ही नवीन जबाबदारी निश्चित चांगल्या प्रकारे पार पाडू असं ना. पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या