spot_img
6.7 C
New York
Thursday, March 13, 2025

Buy now

spot_img

धनंजय मुंडे खंडणी वर जगणारे नेते नाहीत!

महंत नामदेव शास्त्री मुंडेंच्या पाठीशी!
बीड :मसाजोग हत्या प्रकरणामुळे वादात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. श्री क्षेत्र भगवान गडचे महंत नामदेव शास्त्री यांनी भक्कमपणे भगवानगड मुंडेंच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. धनंजय हा काही खंडणी वर जगणारा नेता नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाली. या हात्येमागे वाल्मिक कराड आणि त्यांची गँग असल्याचे समोर आले. कराड व इतरांना अटक झाली. दरम्यान या प्रकरणात गेल्या पन्नास दिवसापासून राज्याचे मंत्री धनंजय मुंडे हे महायुती आणि महाविकास आघाडी मधील आमदारांच्या टार्गेट वर आहेत.
विशेषतः आ सुरेश धस, आ संदीप क्षीरसागर, आ प्रकाश सोळंके, आ जितेंद्र आव्हाड, खा बजरंग सोनवणे यांनी मुंडे यांच्या राजीनाम्या साठी दबाव वाढवला आहे. अंजली दमानिया, तृप्ती देसाई यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसापासून तणावात आहेत.गुरुवारी बीडची बैठक संपवून मुंडे मुक्कामी भगवानगडावर गेले. त्या ठिकाणी नामदेव शास्त्री आणि मुंडे यांच्या दोन तास चर्चा झाली.
शुक्रवारी सकाळी नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले कि, गावातील वादातुन मसाजोग मध्ये हा प्रकार घडला, जो दुर्दैवी आहे. मात्र यामध्ये धनंजय मुंडे यांचा दोष नाही. त्यांना गेल्या दोन महिन्यापासून मीडिया कडून टार्गेट केलं जात आहे. ते भगवानगडाचे निसिम भक्त आहेत. खंडणी वर जगणारे नेते नाहीत. लोकांमध्ये राहून त्यांच्या अडचणी सोडवणार्‍या नेत्याला आज अडचणीत आणले जातं आहे. भगवान गड भक्कमपणे मुंडे यांच्या पाठीशी आहे. माझे आशीर्वाद त्यांच्या सोबत आहेत. ते दोषी नाहीत असे म्हणत शास्त्री यांनी या सगळ्या वादात मंत्री मुंडे यांची बाजू भक्कमपणे मांडली आहे.

ताज्या बातम्या