spot_img
-8.4 C
New York
Wednesday, January 22, 2025

Buy now

spot_img

घोडका राजुरीजवळ बसने ५ जणांना उडविले

बीड : बीड तालुक्यातील घोडका राजुरी जवळ एसटी बसने पोलिस भरतीची तयारी करणार्‍या ५ जणांना चिरडल्याची दुर्दैवी दुर्घटना आज दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी घडली. बीड परभणी गाडीने हा अपघात झाला असून घोडका राजुरी येथीलच तिघा जणांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
परभणी कडे जाणार्‍या या गाडी मुळे अपघात झाला असून सकाळी रनिंगची प्रॅक्टिस करणार्‍या या मुलांना बसने धक्का दिला. यातील दोघांनी वेळीच उड्या मारल्याने ते बचावले मात्र तिघे अपघातात जागीच ठार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तिन्ही मयत मुलांना जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. यामध्ये १) सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे (वय २०) २) विराट बब्रूवान घोडके (१९) ३) ओम सुग्रीव घोडके (२०) यांचा मयतामध्ये समावेश आहे.

ताज्या बातम्या