ज्ञानेश्वर काकड | नाशिक
नाशिक जिल्ह्यातील शिवपानंद शेतकरस्ते चळवळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १६ डिसेंबर २०२४ रोजी ऐतिहासिक ’पेरू वाटप आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व श्री. शरद पवळे आणि श्री. दादासाहेब जंगले पाटील यांनी केले.हे आंदोलन नाशिक जिल्ह्यातील शेत रस्त्यांच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. शेतकर्यांच्या पिकांसाठी आवश्यक सुविधा, बाजारपेठ आणि रस्त्यांच्या उभारणीसाठी ठोस निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आंदोलक शेतकर्यांनी केली.
पेरू वाटून अनोखे आंदोलन: शेतकर्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पेरू वाटून आंदोलन केले. यामुळे शेतमालाला योग्य दर मिळावा आणि शेतकर्यांच्या अडचणी सोडवाव्यात, असा संदेश देण्यात आला. या आंदोलनाला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना केल्या नाहीत, तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. महाराष्ट्र राज्य शिव पानशेत रस्ता चवळीचे प्रणेते अध्यक्ष शरद भाऊसाहेब पवळे, महाराष्ट्र राज्य शिव पालन क्षेत्राचा चवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब पोपटराव जंगले पाटील, ज्ञानेश्वर काकड, मधुकर पतीलबा संगमनेरे,परसराम धांडे, सोमनाथ धात्रक,यावेळी आदि शेतकरी उपस्थित होते