spot_img
6.7 C
New York
Wednesday, December 18, 2024

Buy now

spot_img

बीड जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

माजलगावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड : सोमनाथ सुर्यवंशी या विद्यार्थीचा कारागृहात मृत्यू झाला. या घटनेचा निषेध व्यक्त करत आज (दि.16) महाराष्ट्र बंदची हाक शिव, फुले, शाहू, आंबेडकर अनुयायांच्या वतीने देण्यात आली होती. माजलगावात व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले व्यवहार कडकडीत बंद ठेवले होते. तर बीड,केज,धारूर,गेवराई,परळी अंबाजोगाई, आष्टी,पाटोदा, शिरूर आदी ठिकाणी शांततेत बंद पाळण्यात आला.
परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान शिल्पाची तोडफोड करण्यात आली होती. याच्या निषेधार्थ संविधान प्रेमी युवक आक्रमक झाले होते. यावेळी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून काही युवकांना मारहाण केली होती. यादरम्यान, न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेल्या सोमनाथ सुर्यवंशी या युवकाचा कारागृहात मृत्यु झाल्याची घटना घडली. या घटनेचा निषेध व्यक्त करत आज बंदची हाक शिव, फुले, आंबेडकर अनुयायांनी दिली होती. या बंदला माजलगाव शहरातील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपले व्यवहार कडकडीत बंद ठेवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्व अनुयायांनी एकत्रित येत पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बाबुराव पोटभरे, मोहन जगताप, श्रीहरी मोरे, कचरू खळगे, अंकुश जाधव, धम्मानंद साळवे, अविनाश जावळे, नवनाथ धायजे, विजय साळवे, अ‍ॅड. बी.आर.डक, सय्यद सलीमबापू, किशोर जावळे, मनोज जगताप, रामराजे रांजवण, मोहन जाधव, फेरोज, आसेफ, राकेश साळवे, सचिन उजगरे, भारत तांगडे, अमोल उजगरे, सदानंद प्रधान, राहुल मस्के, राज खळगे, गोविंदा टाकणखार, सय्यद फारूक, राजेश घोडे, प्रा.धम्मानंद बोराडे, अमोल शेरकर ,प्रदीप पटेकर सत्यभामा सौंदरमल, विजय पोळ, रूपचंद कांबळे, राजेंद्र टाकणकार, निलेश कांबळे, निलेश कांबळे, आदी नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्या