बीड : आज नागपूर येथे मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यानुसार दिल्ली येथे भाजपाची यादी फायनल झाली असून पंकजा मुंडे यांना वरिष्ठ नेत्याचा फोन आला असून त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार आहे. पाच वर्षांपासून पंकजाताईंनी जो संघर्ष भोगला आहे. त्याचेच फळ असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
२०१९ च्या विधनासभा निवडणुकीत पराभव स्विकारल्यानंतर, पंकजा मुंडे या भाजपा सोडणार,वेगळ्या पक्षात जाणार अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. परंतु पंकजा मुंडे यांनी संयम बाळगळा, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत उमेदवारी घेतली. आणि केंद्रात नेतृत्व करण्याचा विचार केला. परंतु लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांनी पराभव स्विकारला. आणि त्यानंतर त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली. त्याचवेळी जर महायुतीचे सरकार आले तर पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याची आशा निर्माण झाली होती. अखेर आज नागपूर येथे मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. यामध्ये पंकजाताई मुंडे मंत्रीमंडळाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांना मंत्रिपदासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून फोन आला असून महाराष्ट्राची ही वाघीण पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राला सरकारमध्ये पाहायला मिळणार आहे, पंकजाताई मुंडे यांच्या रूपाने भाजपाने पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे यांच्या वारसाला सत्तेत सामील करून घेण्याचा निर्णय घेतल्याने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात आनंद व्यक्त केला जात आहे.
भाजपकडून १९ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन-
भाजपकडून १९ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केल्याची माहिती समोर येत आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फोन करत आहेत. त्यामुळे भाजपचे मुख्यमंत्री आणि आज शपथ घेणारे १९ लोक असे २० मंत्री राहतील. अजित पवार यांचे आज ९ मंत्री शपथ घेतील. (अजितदादा धरून राष्ट्रवादीचे १० मंत्री होतील), तर एकनाथ शिंदे यांचे ११ मंत्री आज शपथ घेतील.(एकनाथ शिंदे यांना धरून शिवसेनेचे १२ मंत्री होतील..) काही जुन्या मंत्र्यांना वगळून त्यांच्या ऐवजी नव्या दमाच्या आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जात असल्याची माहिती आहे. भाजपचे २० शिवसेनेचे १२ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे १० असे ४२ मंत्री आता मंत्रिमंडळात राहतील. तर १ जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत भाजपकडून कोणा कोणाला मंत्रिपदासाठी फोन-
नितेश राणे
शिवेंद्रराजे भोसले
चंद्रकांत पाटील
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
जयकुमार गोरे,
अतुल सावे
आतापर्यंत शिवसेनेकडून कोणा कोणाला मंत्रिपदासाठी फोन-
भरत गोगावले
उदय सामंत
प्रताप सरनाईक
योगेश कदम
आशिष जैस्वाल
गुलाबराव पाटील
शंभूराजे देसाई
प्रकाश आबीटकर
संजय राठोड
राष्ट्रवादीकडून कोणाला मंत्रिपदासाठी फोन-
आदिती तटकरे
बाबासाहेब पाटील
दत्तमामा भरणे
हसन मुश्रीफ
नरहरी झिरवाळ