बीड : येथील कॅफे फोरचे मालक विवेक सुधाकर जाधव यांनी एका अल्पवयीन मुलीला एका मुलासोबत एकांतवासात अश्लील कृत्य करण्यास बसू दिले. या प्रकरणाची खातरजमा करण्यात आली आणि व्हिडिओ शूटिंग पण करण्यात आली. यामुळे रितसर तक्रार नोंदवून यातील तो मुलगा आणि कॅफे मालक विवेक सुधाकर जाधव, राहणार संत नामदेव नगर, बीड यास अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच फिर्याद मध्ये असा पण उल्लेख आहे की , इतरही कॅफेवर अशा प्रकारचे अश्लील कृत्याला परवानगी देण्यात येत असते. यामुळे शहरातील सर्व कॅफे आता या गुन्ह्याच्या तपासात अंतर्भूत झाली असून ज्या कॅफेमध्ये अशा प्रकारचे आक्षेपार्य जोडपे सापडतील त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात येणार आहे.
सदरील कारवाई, श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक बीड, अपर पोलीस अधीक्षक बीड श्री सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. विश्वांबर गोल्डे, बीड, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ , सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबाजी राठोड, पोलीस अंमलदार गोरे, सुशेन पवार, मनोज परजणे सय्यद आशपाक यांनी केली आहे.