spot_img
11.9 C
New York
Wednesday, March 12, 2025

Buy now

spot_img

बीडमधील खून प्रकरणातील आरोपींना शिक्षा

बीड  : शहरातील बालेपीर भागात अकरा वर्षापूर्वी खंडणीच्या कारणावरून झालेली बाचाबाची याचा राग मनात धरून 2019 मध्ये धारदार शस्त्राने संघटीत गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांनी संगनमताने हल्ला केला. जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याचा न्यायालयात खटला चालू असताना तब्बल पाच वर्षानंतर निकाल लागला असून अखेर 14 आरोपी दोषी ठरविण्यात आले होते. या प्रकरणी सर्व आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदरील या प्रकरणात खून, खंडणी, खून करण्याचा प्रयत्न इतर कलमानुसार हे प्रकरण गेल्या पाच वाच वर्षांपासून न्यायालयात चालू होते. बीड मोक्का न्यायालयाने हा पहिला निर्णय दिला आहे. सदरील सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड.अजय तांदळे यांनी काम पाहीले.
दि.26 सप्टेंबर 2013 रोजी फिर्यादीचा भाउ सय्यद साजेदअली मिर अन्सारअली यास अन्वरखान उर्फ गुज्जरखान पिता मिर्झाखान व त्याचे साथादारांनी मिळुन खंडणीची मागणी केली होती. फिर्यादीचा भाउ साजेदअली याने खंडणी (पैसे) न दिल्याने अन्वरखान उर्फ गुज्जरखान व त्याचे साथीदारांनी नगर रोड, रोषणपुरा, बालेपीर बीड येथे रोडवर तिक्ष्ण हत्याराने दोन्ही पायावर वार करून प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणाची केस मागे घेण्यासाठी लोखंडी खंजीर, लोखंडी कुक-या, लोखंडी तलवार, लाकडी दांडे या हत्याराने मयताच्या छातीवर, गळयावर, बरगडीवर, हातावर सपासप वार करून गंभीर जखमी करून खुन केला.
या प्रकरणात 14 आरोपी दोषी ठरविले होते. या प्रकरणी शुक्रवार दि.13

भा.द.वी कलम 302,201, 120-ब, 147, 148, 195-अ,149 तसेच सह कलम 3(1)(ळ),3(2), 3(4), 3 (5) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधि. 1999 प्रमाणे दोषी ठरविण्यात आले तसेच अरोपी कं 17. यास कलम 212 भादवी प्रमाणे तर आरोपी कं 1 आणि 18 यांना कलम 384 भादवी प्रमाणे दोषी ठरविण्यात आले तसेच आरोपी कं 1 यास कलम 3/25, 4/27 शस्त्र अधिनियम प्रमाणे दोषी ठरविण्यात आले तसेच आरोपी कं 17 यास कलम 3(3) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधि. 1999 प्रमाणे तसेच आरोपी कं 1,6,7,8,11,12 आणि 16 यांना कलम 3(4) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधि. 1999 प्रमाणे दोषी ठरविण्यात आल होते.
सदर प्रकरणी आज रोजी अंतिम सुनावणी होवून दोषी आरोपींना आज रोजी बीड जिल्हा विशेष मोक्का न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी कलम 302,120-ब, भांदवी 3(1) (ळ) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधि. 1999 नुसार आरोपी 1. अन्वरखान उर्फ गुज्जरखान पिता मिर्झाखान 5. मुजीबखान मिर्झाखान पठाण 6. सय्यद नासेर सय्यद नुर 7. सय्यद शाहरुख सय्यद नुर 8. शेख उबेद शेख बाबु 9. शेख सर्फराज उर्फ सरूडॉन 11. शेख शहबाज शेख कलीम 12. शेख अमर शेख अकबर 13. शेख बबर शेख युसूफ 14. आवेज काझी 15. शेख इमरान उर्फ काला शेख रशीद 16. शेख मजहर उर्फ काल्या उर्फ हाफमर्डर शेख रहीम यातील दोषीना अजन्मकारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपये द्रव्य दंडाची शिक्षा व द्रव्य दंड न भरल्यास अधिक तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली वरील 1 ते 12 आरोपींना गैर कायदयाची मंडळी जमवून गुन्हा केल्याप्रकरणी प्रत्येकी दोन वर्ष कारावास व प्रत्येकी पाचशे रुपये द्रव्य दंडाची शिक्षा व द्रव्य दंड न भरल्यास अधिक एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली वरील 1 ते 12 आरोपींना खोटी साक्ष देण्यासाठी धमकावल्या प्रकरणी गुन्हा केल्याप्रकरणी प्रत्येकी तीन वर्ष कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा व द्रव्य दंड न भरल्यास अधिक तीन महिना कारावासाची शिक्षा सुनावली.
वरील 1 ते 12 आरोपींना खोटी साक्ष देण्यासाठी धमकावल्या प्रकरणी गुन्हा केल्याप्रकरणी प्रत्येकी तीन वर्ष कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा व द्रव्य दंड न भरल्यास अधिक तीन महिना कारावासाची शिक्षा सुनावली. वरील 1 ते 12 आरोपींना पुरावे नष्ट करणे, समान उद्देशाने गुन्हे करणे याकरिता कलम 201 व 149 भादवी गुन्हा केल्या प्रकरणी प्रत्येक आरोपीस दोन वर्ष कारावास व प्रत्येकी एक हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा व द्रव्य दंड न भरल्यास अधिक दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी कमांक 17. बबरखान गुलमंहमदखान पठाण यास आरोपीस फरार होण्यास मदत केले कामी कलम 212 भांदवी व 3(4) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधि. 1999 अन्वये आरोपीला दोषी ठरवून पाच वर्षे कारावास पाच लाख रुपये द्रव्य दंडाची शिक्षा व द्रव्य दंड न भरल्यास अधिक तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.आरोपी क्रमांक 1. अन्वरखान उर्फ गुज्जरखान पिता मिर्झाखान व आरोपी कमांक 18. शेख वसीम शेख बुर्‍हानोद्वीन यांना खंडणी मागितल्याप्रकरणी दोषी ठरवून आरोपी क्रमांक 1 यास तीन वर्ष कारावास व पाच हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा व द्रव्य दंड न भरल्यास अधिक सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. व आरोपी कमांक 18 यास सहा महिने कारावास व पाचशे रुपये द्रव्य दंडाची शिक्षा व द्रव्य दंड न भरल्यास अधिक एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली.
आरोपी क्रमांक 1. अन्वरखान उर्फ गुज्जरखान पिता मिर्झाखान यास हत्यार बाळगल्या प्रकरणी आरोपीला दोषी ठरवून सात वर्षे कारावास पाच हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा व द्रव्य दंड न भरल्यास अधिक सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली.आरोपी क्रमांक 5. मुजीबखान मिर्झाखान पठाण 9. शेख सर्फराज उर्फ सरूडॉन 14.आवेज काझी 15. शेख इमरान उर्फ काला शेख रशीद आरोपीस कलम 3(1) (ळ),3(2) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधि. 1999 अन्वये आरोपींना दोषी ठरवून 10 वर्षे कारावास पाच लाख रुपये द्रव्य दंडाची शिक्षा व द्रव्य दंड न भरल्यास अधिक तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी क्रमांक 1. अन्वरखान उर्फ गुज्जरखान पिता मिर्झाखान 6. सय्यद नासेर सय्यद नुर 7. सय्यद शाहरुख सय्यद नुर 8. शेख उबेद शेख बाबु नुर 11. शेख शहबाज शेख कलीम रा. रोषणपुरा बीड 12. शेख अमर शेख अकबर 16. शेख मजहर उर्फ काल्या उर्फ हाफमर्डर शेख रहीम वरील सर्व आरोपीस कलम 3(4) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधि. 1999 अन्वये आरोपींना दोषी ठरवून 10 वर्षे कारावास व पाच लाख रुपये द्रव्य दंडाची शिक्षा व द्रव्य दंड न भरल्यास अधिक तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.
सदर प्रकरणी सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकिल अ‍ॅड. अजय श्री. तांदळे यांनी काम पाहिले त्यांना जिल्हा सरकारी वकील व सर्व सहा. सरकारी वकिल यांचे सहकार्य लाभले.

 

ताज्या बातम्या