बीड : देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून बीड येथील लाडक्या बहिणीने आचारसंहिता लागल्यापासून रोज जपाअनुष्ठान केले. त्यांनी केलेल्या जपाअनुष्ठानचे फळ म्हणून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर दिसून येत होता.
येथील लाडकी बहिण सौ. पुनम ओमप्रकाशअप्पा लांडगे यांनी महाराष्ट्र विधान सभेची आचारसंहिता लागल्यापासून दररोज न चुकता रात्रीचा दिवस करून, घर सांभाळून २५००० जप करत होत्या. विशेष म्हणजे त्यांना दोन लहान मुले असुन मुलगी ५ वर्षांची तारकेश्वरी व मुलगा २ वर्षाचा विश्वेस असून राज्यात भा.ज.पा.चे सरकार बहुमतात येऊन मुख्यमंत्रीपदी मा. देवेंद्र भाऊ फडणवीस बसावेत म्हणून ११२५००० गुरू मंत्राचा जप केला तसेच भगवान व्यंकटेशाचे स्त्रोत्र पण रोज म्हणत होत्या. मा. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नाहीत अशा बातम्या येऊ लागल्यानंतर त्यांनी पुन्हा ५००००० जपाचा संकल्प सोडला. त्यांना देवा भाऊकडे पाहून एक संस्कारी, शांत, संयमी, हुशार एक दुरदृष्टी असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या गादीवर बसावा असे सतत वाटत होते. खरं म्हणजे देवा भाऊकडे एका जातीपुरते मर्यादित न बघता राजा कसा असावा याचे एक मुर्तीमंत उदाहरण म्हणजेच देवा भाऊ आहेत. देवा भाऊंकडे पाहून मला एक महाभारतातील श्लोक आठवतो.
कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेषु कदाचनः कर्म करत असताना फळाची अपेक्षा करू नये असेही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
देवा भाऊंसाठी त्यांनी खास कविता सांगितली
विझलो आज जरी मी
हा माझा अंत नाही.
पेटेन उद्या नव्याने
हे सामर्थ्य नाशवंत नाही
छाटले जरी पंख माझे
पुन्हा उडेन मी
अडवू शकेल मला
अजून अशी भिंत नाही.
कवि सुरेश भट