नाशिक । प्रतिनिधी
पोलीस अधिक्षक श्री विक्रम देशमाने सो यांनी अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करणार्यावर प्रभावी कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांनी सिन्नर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना सिन्नर पोलीस स्टेशन हददीत अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करणार्यांवर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. सदरच्या पथकाने गोपणिय माहीती काढुन इसम नामे गणेश बंडु पेटकर वय-40 वर्ष, रा- गंगावेस, सिन्नर, ता- सिन्नर, जि- नाशिक यास सिन्नर शहरात अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करतांना 16,100=00 रूपये किंमतीच्या मुददेमालासह पकडण्यात यश आले आहे.
सदरची कारवाई मा पोलीस अधिक्षक श्री विक्रम देशमाने सो, नाशिक ग्रामीण, मा अपर पोलीस अधिक्षक श्री अदित्य मिरखेलकर सो, नाशिक ग्रामीण, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री डॉ निलेश पालवे सो, निफाड उपविभाग, निफाड यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड, सिन्नर पोलीस ठाणे यांचे सुचनांप्रमाणे सिन्नर पोलीस ठाणेचे पोलीस उप निरीक्षक श्री संजय वाघमारे, पोलीस अंमलदार समाधान बोराडे, आप्पासाहेब काकड व कृष्णा कोकाटे यांनी केलेली आहे. सदर इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास चालु आहे. अवैध नायलॉन मांजाविषयी कोणालाही काही माहीती मिळाल्यास तात्काळ पोळीसांना माहिती कळवावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.