किल्ले धारूर : किल्लेधारूर घाटामध्ये ४ डिसेंबर बुधवार रोजी दुपारी १२ वाजता माजलगाव येथील २२ वर्षीय विशाल काळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडली.
किल्लेधारूर येथील घाटामध्ये आत्महत्या च्या घटनेमध्ये वाढ होत आहे. या अगोदरही आत्महत्या घटना घडल्या आहेत. चार डिसेंबर बुधवार रोजी धारूर येथील घाटामध्ये दुपारी बारा वाजेच्या दरम्यान अनोळखी इसमाने झाडाला आत्महत्या केल्याची घटना तेथील वाटसरूणे पाहिली याची माहिती धारूर पोलीस स्टेशनला दिल्यानंतर धारूर येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे हेडकॉन्स्टेबल गवळी, तुकाराम चांदणे सह इतर कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत झाडाला गळफास घेतलेल्या तरुणाला खाली घेऊन ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणले आसुन ही घटना ३ डिसेंबर च्या रात्री घडल्याची माहिती समोर येत आहे. आत्महत्या केलेला तरुणाची ओळख पटली असून त्याचे नाव विशाल कोंडीबा काळे रा ढेपेगाव (चिंचोली) ता.माजलगाव असे आहे. संबंधित तरुणाचे आई-वडील, भाऊ कर्नाटक येथे ऊस तोडणी ला गेलेले आहेत तो स्वतः पंढरपूर येथील लॉजवर काम करतो तो गावी येऊन तो परत ३ डिसेंबर मंगळवार रोजी कामाच्या ठिकाणी पंढरपूरला निघाला पण तो धारूर मध्येच थांबला व त्याने धारूर येथील घाटामध्ये तील डिसेंबरच्या रात्री आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आणखीही आत्महत्याचे कारण समजले नाही. तरी पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.