भाजप विधिमंडळ नेतेपदी
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी आज (दि. ४)एकमताने निवड झाली आहे. त्यामुळे फडणवीस यांचेच नाव भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव मांडला. देवेंद्र फडणवीस यांच्या गटनेतेपदासाठीच्या नावाच्या प्रस्तावाला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुंटे, आशिष शेलार, योगेश सागर, गोपीचंद पडळकर, दिलीप बोरसे यांच्यासह भाजपच्या सर्व आमदारांनी अनुमोदन दिले.
विधानभवनातील सेंट्रल हॉल येथे आज (दि. ४) सकाळी १० वाजता भाजप आमदारांची बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत भाजप गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे.. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (तळक्षरू र्ठीरिपळ) आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (छळीारश्रर डळींहरीरारप) यांची महाराष्ट्राचे केंद्रीय निरीक्षक म्हणून यांनी भाजपचे निरीक्षक म्हणून काम पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला होता.