spot_img
2.4 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

spot_img

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार

गृहऐवजी नगरविकास अन् आणखी एक महत्त्वाचे खाते मिळणार?
मुंबई : एकनाथ शिंदे हे महायुतीच्या नवीन मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याची माहिती अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी दिली. शिंदेसेनेच्या एका नेत्याने ’लोकमत’ला सांगितले की याबाबत पक्षाच्या आमदारांनी केलेला आग्रह त्यांनी मान्य केला आहे.
भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा शपथविधी दि. ५ डिसेंबरला होत असताना शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? याविषयी पाच दिवसांपासून उलटसुलट चर्चा होती.
शिंदे उपमुख्यमंत्री होतील पण त्यांना गृहमंत्रिपद द्यायला हवा अशी मागणी शिंदेसेनेकडून करण्यात आली होती. माजी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय शिरसाट यांनी जाहीरपणे तशी मागणी केली होती. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की गृहमंत्रिपद हे मुख्यमंत्र्यांकडेच राहावे, असा भाजपचा आग्रह आहे. तो मान्य करत शिंदे यांना नगरविकास आणि आणखी एक महत्त्वाचे (जसे एमएसआरडीसी) द्यावे, असा नवीन पर्याय समोर आला. त्यावर दोन्ही पक्ष राजी होतील असे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असतील असे अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यानुसार आता ते आणि शिंदे उपमुख्यमंत्री असणार आहेत.

ताज्या बातम्या