spot_img
25 C
New York
Wednesday, September 3, 2025

Buy now

spot_img

गेवराई : अर्धांगवायू पत्नीला झाल्याचे कळताच पतीचा मृत्यू

गेवराई : पत्नीला अर्धांगवायू झाल्याचे समजताच  गेवराईत पतीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी  अंबड येथे घडली.
बाजीराव रंगनाथ बंडेकर (वय ७८) रा.सेलू ता. गेवराई जि.बीड असे मृत झालेल्या पतीचे नाव असून, त्यांची पत्नी सुदामती बंडेकर यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने अंबड (जि जालना) येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
रविवार  अंबड येथील मुलीकडे पत्नी असल्याने बाजीराव बंडेकर गेले होते. मात्र तेथे गेल्यावर त्यांना आपल्या पत्नीला अर्धांगवायू झाल्याचे समजताच ते त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. मात्र, पत्नीची परिस्थिती पहाता रुग्णालयातून बाहेर येताच त्यांना पत्नीचे दुःख सहन झाले नसल्याने बाजीराव बंडेकर यांना रुग्णालयाच्या बाहेर हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य स्व.शेषेराव बंडेकर यांचे भाऊ तर मदन बंडेकर यांचे ते चुलते होतं.

ताज्या बातम्या