महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, महायुतीने 217 जागांवर स्पष्ट बहुमताची आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीने 51 जागांवर आघाडी घेतली आहे. इतर 20 जागांवर आघाडीवर आहे. ’हा दणदणीत विजय असून लाडक्या बहिणींचे अभिनंदन’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या विजयानंतर दिली आहे. दरम्यान, महायुतीने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
दरम्यान, भाजपची विधीमंडळ पक्षाची बैठक 25 नोव्हेंबर रोजी आणि सरकारचा शपथविधी सोहळा 26 रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. तर महायुती आघाडीची बैठकही याच सुमारास होण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त एएनआयने दिले आहे.
’’माझ्या लाडकी बहिणींचे मनापासून अभिनंदन करतो. आम्ही केलेल्या विकासकामांची जनतेला पोचपावती मिळाली. या विजयामुळे पुढील काळात आमची जबाबदारी वाढली आहे. जनतेला त्रिवार वंदन करतो. महायुतीला आशीर्वाद दिल्याबद्दल जनतेचे आभार मानतो. समाजातील प्रत्येक घटकाचे अभिनंदन करतो. महायुतीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो’’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (एज्ञपरींह डहळपवश) यांनी दिली आहे. दरम्यान, ठाण्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना ’लाडू’ भरवून विजयाचा आनंद साजरा केला.
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आमच्या अपेक्षेप्रमाणे आम्हाला खूप चांगल्या जागा मिळाल्या आहेत. महायुतीच्या पाठीशी उभे राहून हा दणदणीत विजय मिळविणार्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो…