spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

सर्वोच्च न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय, प्रयागराज रेल्वे स्थानक, अलाहाबाद उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष आशुतोष पांडे आणि जन्मभूमी-शाही ईदगाह प्रकरणी खटला दाखल करणार्‍या व्यक्तीच्या व्हॉट्सपवर धमकीचा संदेश आला आहे.
मंगळवारी, मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयातही सुनावणी झाली. त्यापूर्वी सोमवारी रात्री उशीरा हा धमकीचा संदेश आला. आशुतोष पांडे यांनी दावा केला आहे की, हा धमकीचा संदेश पाकिस्तानातून आला आहे. सोमवारी, रात्री दीडच्या दरम्यान व्हॉट्सपवर पाकिस्तानी नंबरवरून ६ धमकीचे संदेश आले असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर २.३६ वाजता व्हॉट्सप कॉलद्वारे धमकी देण्यात आली. श्रीकृष्ण जन्मभूमी शाही ईदगाह प्रकरणात आशुतोष पक्षकार आहेत. ते श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टचे अध्यक्षही आहेत.

ताज्या बातम्या