spot_img
24.4 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img

जुगार अड्ड्यावर छापा;48 लाखांचा मुद्देमाल पकडला

बीड : पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा जुगार्‍यांना दणका,गेवराई परिसरातील जुगार अड्ड्यावर छापेमारी, दहा जणांना रंगेहाथ पकडले, 48 लाखांचा मुद्देमाल जप्त, कारवाईमुळे पुन्हा एकदा जुगार्‍यांचे धाबे दणाणले
बीड,पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या पथकाने जुगार्‍यांना मोठा दणका दिला आहे, पोलीस अधीक्षक पथकाचे बाळराजे दराडे यांनी गेवराई परिसरातील हॉटेल तोरणा च्या पाठीमागे उदय पानखडे यांच्या मालकीच्या एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर रात्री पावणे अकराच्या सुमारास छापेमारी केली, यावेळी जुगार खेळताना बाळूनाथ मोहन मोटे, दीपक वामनराव सोनवणे, अमोल दत्तात्रय गांडुळे, श्याम बाबुराव चव्हाण, बाळू पापा राठोड, वचिष्ठ भिमराव ठोसर, कपिल भास्कर मुंजे, ज्ञानेश्‍वर सूर्यकांत लांडगे, पोपट छगन दाभाडे, गणेश गोरख, दावडकर या दहा जणांना पकडले, यावेळी त्यांच्याकडील रोख रकमेसह मोबाईल, गाड्या असा एकूण 48 लाख 18 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंद्यावाल्यांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले आहेत.

ताज्या बातम्या