बीड : मोठ्या प्रतिक्षेनंतर जयदत्तअण्णा क्षीरसागरांनी अखेर मनगटावर घडी बांधली आहे.
बीड विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीतुन उमेदवारी मागे घेतल्यानंतर आता माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपली राजकीय भूमिका जाहिर केली आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुतणे महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला.यामुळे डॉ.योगेश क्षीरसागर यांचे बळ वाढले आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका जाहीर केली. जयदत्त क्षीरसागर म्हणाले